..आता माझी हत्या होणार! पुजाच्या चुलत आजीचा खळबळजनक आरोप

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:- आता माझी हत्या होणार आहे. पूजा प्रकरणातील जे आरोपी आहे तेच माझी हत्या करणार आहे. मुख्यमंर्त्यांपर्यंत मला जाऊ देणार नाही, मला धमक्या येत आहे.

संजय राठोड, अरुण राठोड आणि विलास चव्हाणसह त्यांच्या नातेवाईकांपासून मला धोका आहे’, असा खळबळजनक आरोप शांताबाई राठोड यांनी केला आहे.

शांताबाई राठोड आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात भेटीसाठी आल्या होत्या. पण यावेळी पोलीस उपआयुक्तांची भेट झाली.

यावेळी पत्रकारांशी बोलत होत्या. ‘मी याबद्दल पोलिसांकडे तक्रार दिली नाही. परळीला गेल्यानंतर तक्रार देणार आहे. माझ्या जीवाला काही धोका झाला तर अशा आरोपींची नावे मी तृप्ती देसाई यांच्याकडे दिली आहे’, असेही शांता राठोड म्हणाल्या.

‘पाच कोटी रुपये दिलेले आहे म्हणून तिच्या आई वडिलांचे तोंड बंद झाले आहे. पूजाचे आणि माझे चांगले रिलेशन होते. परळीतील सीसीटीव्ही मिळावे यासाठी अर्ज दिला आहे.

अरुण राठोड हा माझ्या चुलत भावाचा मुलगा आहे. त्याचा या प्रकरणात कोणताही संबंध नाही. जर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नाहीतर मुख्यमंत्र्याना भेटायला जाणार आहे, असंही शांताबाई राठोड यांनी सांगितलं.

पूजाचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होवू नये म्हणून तृप्ती देसाई यांची मदत घेतली. पोलीस निरीक्षक लगड यांना कारवाई करायची नाही, सर्वसामान्यावर लवकर कारवाई होते. पण या प्रकरणी अजूनही गुन्हा दाखल झाला नाही.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24