अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- बॉलीवूडने दोन दिवसात ऋषी कपूर आणि इरफान खान हे दोन अनमोल हिरे गमावले आहेत. यानंतर अचानक बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनाही रूग्णालयात भरती करण्यात आल्याची बातमी व्हायरल झाली आणि चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला.
परंतु हि बातमी खोटी आहे, यात सत्यता नसून केवळ अफवा आहे. इरफान व ऋषी कपूर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकूल वातावरण असतानाच काल सोशल मीडियावर नसीरूद्दीन यांची प्रकृती गंभीर असल्याची बातमी व्हायरल झाली.
नसीरूद्दीन शाह गेल्या अनेक दिवसांपासनू आजारी आहेत. मात्र काल अचानक प्रकृती जास्त बिघडल्याने त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला होता.
या बातमीनंतर नसीरूद्दीन यांच्या घरचे फोन खणखणू लागले. बॉलिवूडमध्ये चिंता पसरली. अखेर नसीरूद्दीन यांनी स्वत: ट्विट करून त्यांच्या प्रकृतीबद्दलचे वृत्त अफवा असल्याचे स्पष्ट केले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®