WhatsApp : आता फोटो आणि व्हिडीओ पाठवणे अधिकच मजेशीर, आले ‘हे’ जबरदस्त फीचर

WhatsApp : व्हॉट्सॲपचे वापरकर्ते खूप आहेत. सोशल मीडियापैकी हे एक प्रसिद्ध ॲप आहे. आपल्या वापरकर्त्यांसाठी हे ॲप सतत जबरदस्त फिचर आणत असते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

लवकरच व्हॉट्सॲप आपल्या वापरकर्त्यांसाठी एक फिचर आणणार आहे. त्यासाठी ते चाचणीही करत आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना आता फोटो आणि व्हिडीओ पाठवणे अधिकच मजेशीर होणार आहे.

अशा प्रकारे करेल काम

Advertisement

iOS साठी नवीन WhatsApp अपडेट आयफोन वापरकर्त्यांसाठी आवृत्ती क्रमांक 22.23.77 सह आणले आहे, अपडेटच्या चेंजलॉगमध्ये असे म्हटले आहे की हे नवीन फीचर काही बगचे निराकरण करते.

तसेच, WABetaInfo या व्हॉट्सॲपच्या नवीन फीचर्सचा मागोवा घेणार्‍या वेबसाइटने एका अहवालात दावा केला आहे की ॲप स्टोअरवरून iOS 22.23.77 साठी नवीनतम WhatsApp अपडेट आल्यानंतर, काही वापरकर्त्यांना कॅप्शनसह मीडिया फॉरवर्ड करता येईल

Advertisement

हे फिचर सर्व वापरकर्त्यांना वापरता येणार नाही. लवकरच हे फिचर सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिले जाईल. त्यानंतर सर्वांना कॅप्शनसह फोटो, व्हिडिओ, दस्तऐवज, फाइल्स, GIF इत्यादी मीडिया फाइल्स फॉरवर्ड करता येईल. यापूर्वी वापरकर्त्यांना संदेश म्हणून स्वतंत्रपणे कॅप्शन पाठवावे लागत होते.त्याशिवाय कॅप्शनसह फॉरवर्ड केलेले संदेश एंड-टू-एंड एनक्रिप्टेड राहतील.

स्वतःला मेसेज पाठवता येतील

WhatsApp iOS आणि Android बीटावर स्वतःला संदेश पाठवण्याच्या क्षमतेची चाचणी घेत आहे. हे फिचर केवळ टेलिग्राममध्ये उपलब्ध आहे. नवीन Android 2.22.24.2 अपडेटमध्ये “Messages Yourself” नावाच्या किरकोळ चाचणी फिचरचा समावेश आहे.

Advertisement

हे फिचर काही बीटा चाचणी वापरकर्त्यांसाठी सादर केले जात आहे. अँड्रॉइड ॲपसाठी नवीनतम अपडेट अपडेट केल्यानंतर, काही बीटा परीक्षकांना चॅट कॅप्शन म्हणून “मेसेज युवरसेल्फ” जोडून WhatsApp वापरकर्ते तुमच्या चॅट्स हायलाइट करत असल्याचे लक्षात येईल, असा दावा WABetaInfo ने दावा केला आहे.

सर्व युजर्ससाठी हे फीचर कधी आणले जाईल याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. परंतु, या फीचरची चाचणी बीटा वापरकर्त्यांच्या लहान गटासह केली जात आहे.त्यामुळे ते सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होण्यासाठी काही वेळ लागेल.

Advertisement