Indian Railways : आता बिनधास्त झोपा! स्टेशन येण्यापूर्वी रेल्वेच करेल तुम्हाला जागे

Indian Railways : रेल्वे प्रशासन आपल्या प्रवाशांसाठी अनेक खास सुविधा उपलब्ध करून देते. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणे खूप सोयीस्कर होते. जर तुम्ही रात्री प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी आता एक खुशखबर आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कारण तुम्ही आता रेल्वेत बिनधास्त झोपता येईल. तुमचे स्टेशन येण्यापूर्वी रेल्वे तुम्हाला कॉल करून जागे करेल. त्यामुळे प्रवाशांचे स्टेशन चुकण्याची भानगड नाही.

रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांची एक मोठी चिंता असते की त्यांना प्रवासातच झोप लागते. त्यामुळे त्यांचे स्टेशन चुकू शकते. अनेकदा प्रवाशांना रात्री नीट झोप लागत नाही, कारण त्यांना आपल्या स्टेशनवर लक्ष ठेवावे लागते.

Advertisement

चिंता होईल दूर

प्रवाशांची हीच समस्या लक्षात घेऊन रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी एक खास सुविधा सुरू केली आहे, त्यामुळे त्यांचा हा त्रास दूर होईल. रेल्वेने सुरू केलेल्या नवीन विशेष सेवेअंतर्गत आता प्रवाशांना स्थानकावर पोहोचण्याच्या 20 मिनिटांपूर्वी कॉल करून उठवले जाणार आहे. यामुळे रात्री झोपताना स्टेशन सुटण्याची काळजी दूर होणार आहे.

‘डेस्टिनेशन अलर्ट वेक अप अलार्म’ असे या रेल्वेच्या खास सुविधेचे नाव आहे. या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला केवळ रेल्वे हेल्पलाइन नंबर 139 डायल करायचा आहे.

Advertisement

डेस्टिनेशन अलर्ट पर्याय निवडून, तुम्हाला प्रथम 7 आणि नंतर 2 अंक डायल करावे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा 10 अंकी पीएनआर क्रमांक टाका असे सांगितले जाईल. त्यानंतर तुम्ही पीएनआर नंबर टाकल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज येईल. यानंतर स्टेशनवर पोहोचण्याच्या 20 मिनिटे आधी तुम्हाला कॉल येईल.