आता ‘त्या’ कुटुंबाचा ऑक्सिजन निर्मितीसाठी पुढाकार!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-सध्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत विखे पाटील परिवार मदतीला धावून आला आहे. तसेही विखे पाटील परिवाराची नेहमीच समाजाशी बांधिलकी राहिली आहे.

मागील चार पिढ्या पासून समाजाच्या प्रत्येक सुखा-दुखात ते सहभागी असतात. आजमितीला राज्यासह जिल्ह्यात प्रथमच मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. यावर मात करण्यासाठीच विखे फाउंडेशन परिसरात कोट्यवधी रुपये खर्च करून

थेट अत्याधुनिक ऑक्सिजन निर्मिती प्लांटची उभारणी करणार आहे. यातील मशीन विदेशातून आयात केली जाणार आहे. अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

खासदार विखे पाटील म्हणाले, मागील वर्षभरापासून कोरोनाच्या अभूतपूर्व संकटाशी मुकाबला सुरू आहे. दिवसेंदिवस बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही बाब लक्षात घेऊनच प्रत्येक जिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभा करण्याचे मत व्यक्त केले होते. हा प्लांट कार्यान्वित झाल्यानंतर विखे पाटील रुग्णालयातील ऑक्सिजनची गरज तर भागणारच आहे.

तसेच शिल्लक राहणारा ऑक्सिजन इतर रुग्णालयांसाठी सुद्धा उपचारासाठी उपलब्ध होऊ शकेल. तसेच प्रशासनाकडून विखे रुग्णालयासाठी पुरविण्यात येणारा ऑक्सिजन इतर रुग्णालयातील रुग्णांच्या उपचारासाठी उपयोगी पडेल.

नगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उद्योजकांच्या फंडातून आणखी एका प्लांटची उभारणी होऊ शकते. याबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असल्याचे ते म्हणाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24