Ahmednagar Bajar Samiti : आता बाजार समितीत रोज सायंकाळी भरणार ‘हा’ बाजार !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Bajar Samiti : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दि. ३१ ऑगस्ट पासून दररोज सायंकाळी ४ ते रात्री १० पर्यंत भाजीपाला, फळे व फुले यांचा बाजार सुरु राहणर आहे. भाजीपाला, फळे, फुले असोसिएशन यांच्या मागणीनुसार संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय झाला आहे.

माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली नगर तालुका बाजार समिती शेतकरी हिताचे निर्णय घेत आहे. शेतकऱ्यांच्या शेती मालाला मुंबई, कल्याण, छत्रपती संभाजीनगर, पुणे व इतरही ठिकाणच्या बाजारपेठा जलद गतीने उपलब्ध होवून शेतीमाल पाठवणे शक्य होईल व बाजारभाव चांगला मिळेल.

शेतकरी दिवसभर आपल्या शेतमालाची काढणी करतात पण ताजा माल पहाटे आणणे अनेकदा जिकरीचे होत असून, तोपर्यंत सुकला जातो त्यामुळे शेतीमालाला योग्य बाजार भाव मिळत नाही.

पण आता सायंकाळी भाजीपाला, फळे व फुले मार्केट सुरु झाल्यास शेतकऱ्यांना आपला ताजा शेतमाल सायंकाळी विक्री करुन तो बाजारपेठेत पाठविणे आणि व्यापारी यांना खरेदी करीता उपलब्ध राहणार आहेत.

समितीने शेतकरी हिताचा निर्णय घेतला असून दररोज सायंकाळी भरणाऱ्या बाजाराचे उदघाटन ३१ ऑगस्ट रोजी माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता होणार आहे.

तरी सर्व भाजीपाला उत्पादक शेतकरी बांधवांनी ३१ ऑगस्ट पासून सायंकाळी ४ वाजता सुरु होणाऱ्या बाजाराचा लाभ घ्यावा. असे आवाहन समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सुळ व संचालक मंडळ यांनी केले.

Ahmednagarlive24 Office