ताज्या बातम्या

Power Bank : आता विजेशिवाय चार्ज होणार स्मार्टफोन, गरजेचे आहे फक्त ‘हे’ उपकरण

Published by
Ahmednagarlive24 Office

Power Bank : जर तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल तर बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची आहे. कधी कधी अचानक अनेकांच्या घरातील वीज जाते. काही ठिकाणी तर किती तरी तास वीज येत नाही. अशावेळी काहींचे स्मार्टफोन चार्ज नसतात त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

जर तुम्हीही अशा समस्येला तोंड देत असाल तर काळजी करू नका. तुमच्या घरातील वीज गेली तरीही तुम्ही आता तुमचा स्मार्टफोन चार्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला एक छोटीसी पॉवर बँक विकत घ्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे या पॉवर बँकची किंमत जास्त नसून ही पॉवर बँक एकाच वेळी 2 स्मार्टफोनची बॅटरी चार्ज करेल.

कॉलमेट पॉवर बँक 

जर तुम्हाला ही पॉवर बँक खरेदी करायची असेल तर तुम्ही ती फ्लिपकार्टवरून सहज खरेदी करू शकता. तिची क्षमता 30000 mAh इतकी आहे. मार्केटमध्ये ही पॉवर बँक फास्ट चार्जिंग सपोर्टसह आणली आहे आणि तिला फ्लिपकार्टवर 3.8 स्टार रेटिंग मिळाले असून या पॉवर बँकेचे सर्वात मोठे फीचर म्हणजे तुम्हाला बॅटरी इंडिकेटर मिळतो.

सध्याच्या काळातही, तुम्ही ते वापरून तुम्ही तुमच्या पॉवर बँकमध्ये किती बॅटरी शिल्लक आहे हे जाणून घेऊ शकता, ज्यामुळे तुम्ही ती पुन्हा डिस्चार्ज होण्यापूर्वी पूर्ण चार्ज करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पॉवर बँकमुळे तुम्ही एकाच वेळी दोन स्मार्टफोन चार्ज करता येतात.

याच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये तुम्हाला 30000 mAh ची बॅटरी मिळत असून ज्यामुळे तुम्ही तुमचे अनेक स्मार्टफोन चार्ज करू शकता आणि तरीही त्यात बॅटरी शिल्लक राहते.ही पॉवर बँक तुम्ही 2659 रुपयात खरेदी करू शकता. या पॉवर बँकेचा आकारही लहान असल्याने ती कुठेही घेता येते.

Ahmednagarlive24 Office