ताज्या बातम्या

…आता महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- सध्या राज्यात नेमकं काय चालले आहे हेच समजत नाही. प्रत्येकजन आपल्या मागण्यासाठी आंदोलन करत आहेत. अजून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन संपत नाही तोच आता

राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे महत्वाचे प्रश्न उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या स्तरावर प्रलंबीत प्रश्न सुटत नसल्याने सोमवार दि.२२ नोव्हेंबर रोजी महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली असून,

या संपाचे निवेदन महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्यावतीने पुणे विभागीय सहसंचालक डॉ.किरणकुमार बोंदर यांना दिली. आश्वासित प्रगती योजनेचा रद्द झालेला शासन निर्णय पुनर्जीवित करण्यात यावा, अकृषी विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मर्चा­यांना सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करावा,

सेवांतर्गत आश्­वासित प्रगती योजनेअंतर्गत सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार ३० वर्षाच्या सेवेनंतर तीन लाभांची सुधारित योजना उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिनस्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करावी, सातव्या वेतन आयोगाची ५८ महिन्यांची थकबाकी अदा करावी.

पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या आदी विविध प्रलंबीत मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. शासनाच्या उदासीनतेमुळे हे प्रश्न सुटलेले नसून, २२नोव्हेंबर रोजी लाक्षणिक संप करून तीव्र आंदोलनाची सुरुवात करण्यात येणार आहे. शासनाने सातत्याने केलेल्या उपेक्षेमुळे आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Ahmednagarlive24 Office