5G plan: आता Jio, Airtel चे टेन्शन संपले, खरंतर हा अदानीचा 5G प्लान आहे! जाणून घ्या हा प्लॅन….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

5G plan: उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या अदानी समूहाने आगामी 5G स्पेक्ट्रम लिलावासाठी अर्ज केला आहे. तेव्हापासून असे मानले जात होते की कंपनीच्या टेलिकॉम सेक्टरमध्ये प्रवेश केल्याने Jio आणि Airtel च्या अडचणी वाढू शकतात, पण आता कंपनीचा 5G प्लॅन (5G plan) समोर आल्याने या दोन्ही कंपन्यांचे टेन्शन संपताना दिसत आहे. जाणून घ्या काय आहे हा प्लान…

अदानी चा 5G प्लॅन –

अदानी समूहाने स्पष्ट केले आहे की, ते ग्राहकांना 5G सेवा देणार नसून त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी 5G स्पेक्ट्रमची आवश्यकता आहे. त्यामुळेच त्यांनी यावेळी बोली प्रक्रियेत सहभाग घेतला आहे. कंपनीला विमानतळ आणि बंदरांसाठी सायबर सुरक्षा (Cyber security), वीज निर्मिती, ट्रान्समिशन, कारखाने, किरकोळ विक्री ते डेटा सेंटर्स आणि सुपर अॅप्ससाठी उच्च दर्जाचे आणि वेगवान इंटरनेट आवश्यक आहे.

अदानी समूह 5G स्पेक्ट्रमच्या लिलावात सहभागी होणार असल्याचे वृत्त पीटीआयने शुक्रवारी दिले होते. मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) रिलायन्स जिओ आणि सुनील भारती मित्तलच्या (Sunil Bharti Mittal) एअरटेलसाठी हे मोठे आव्हान मानले जात आहे, परंतु आता कंपनीचा 5G प्लॅन समोर आल्यानंतर या दोन्ही कंपन्यांचा तणाव कमी होताना दिसत आहे.

26 जुलै रोजी लिलाव होणार आहे –

बातम्यांनुसार, तीन खाजगी दूरसंचार कंपन्या Jio, Airtel आणि Vodafone Idea ने 26 जुलै रोजी होणाऱ्या स्पेक्ट्रम लिलावासाठी अर्ज केला आहे. यामध्ये एंट्री मारणारी चौथी कंपनी अदानी ग्रुप आहे. कंपनीने नुकतेच नॅशनल लाँग डिस्टन्स (National Long Distance) आणि इंटरनॅशनल लाँग डिस्टन्स (ILD) परवाने घेतले आहेत.

5G स्पेक्ट्रमचा लिलाव होणार आहे –

5G स्पेक्ट्रमच्या लिलावासाठी सरकारने निश्चित केलेल्या टाइमलाइननुसार, 12 जुलै रोजी अर्ज केलेल्यांची माहिती 12 जुलै रोजी सार्वजनिक केली जाईल. सरकार एकूण 72,097.85 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमचा लिलाव करणार आहे. त्याची किंमत सुमारे 4.3 लाख कोटी रुपये आहे.

या लिलावाअंतर्गत 600 MHz, 700 MHz, 800 MHz, 900 MHz, 1800 MHz, 2100 MHz, 2300 MHz आणि 3300 MHz मिड फ्रिक्वेन्सी बँडमध्ये आणि 26 GHz स्पेक्ट्रम या हाय फ्रिक्वेन्सी बँडमध्ये लिलाव करण्यात येणार आहेत.