अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- आयपीएल चौदावा हंगाम ४ मे रोजी तहकूब करण्यात आला. 60 पैकी 29 सामने झाले आहेत. उर्वरित 31 सामने यूएईमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार आहेत. बीसीसीआय डिसेंबरमध्ये आयपीएल मेगा ऑक्शन करू शकते.
म्हणजेच खेळाडूंचा नव्याने लिलाव करण्यात येणार आहे. सर्व संघ 4 खेळाडू संघात कायम ठेऊ शकतील. पण यासाठी अट ठेवण्यात आली आहे. या खेळाडूंमध्ये एक परदेशी किंवा दोन देशांतर्गत व दोन परदेशी खेळाडू असणे आवश्यक आहे.
एका आयपीएल संघात जास्तीत जास्त २५ खेळाडू ठेवता येतात. आता दोन संघांचा समावेश होत असल्यामुळे नविन 50 खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळेल. बीसीसीआय आयपीएलच्या पुढील हंगामात दोन नविन संघाचा समावेश करणार आहे.
ऑगस्टपर्यंत या संघाच्या निविदा बीसीसीआय मागवू शकते. आतापर्यंत आठ संघ आयपीएलमध्ये खेळत होते. नविन दोन संघाचा समावेश वाढल्याने सामने वाढतील. यामुळे स्पर्धेतील रोमांच आणखी वाढणार आहे.
हे दोन संघ खरेदी करण्यासाठी गोएंका ग्रुप आणि अदानी ग्रुप शर्यतीत आहेत. अहमदाबाद आणि लखनऊ फ्रेंचायझी यात पुढे आहेत. दोन नवीन संघांच्या समावेशानंतर सामन्यांची संख्याही 15 ते 30 ने वाढणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआय डिसेंबरमध्ये आयपीएल मेगा ऑक्शन करू शकते. म्हणजेच खेळाडूंचा नव्याने लिलाव करण्यात येणार आहे. सर्व संघ 4 खेळाडू संघात कायम ठेऊ शकतील. पण यासाठी अट ठेवण्यात आली आहे.
या खेळाडूंमध्ये एक परदेशी किंवा दोन देशांतर्गत व दोन परदेशी खेळाडू असणे आवश्यक आहे.एका आयपीएल संघात जास्तीत जास्त २५ खेळाडू ठेवता येतात. आता दोन संघांचा समावेश होत असल्यामुळे नविन 50 खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळेल.
दरम्यान, आयपीएल चौदावा हंगाम ४ मे रोजी तहकूब करण्यात आला. 60 पैकी 29 सामने झाले आहेत. उर्वरित 31 सामने यूएईमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार आहेत.