आता नगर तालुक्यातील ‘या’ निवडणुकांचा बिगुल वाजला!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:-  महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका आहे, त्या टप्प्यावर दि. ३१ मार्च पर्यंत थांबविलेल्या आहेत.

तथापि उच्च / सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशित केलेल्या संस्था या आदेशातून वगळलेल्या आहेत. त्यामुळे नगर तालुक्यातील सारोळा कासार व बाबुर्डी बेंद या २ सेवा सोसायट्यांचा निवडणूक कार्यक्रम जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी जाहीर केला आहे.

या दोन्ही सोसायट्यांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवार (दि.१) पासून सुरु झाली असून ५ मार्च पर्यंत सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

दाखल अर्जांची छाननी दि. ८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेणेसाठी  दि. ९ ते २३ मार्च पर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत आहे.

सारोळा कासार सोसायटीसाठी ३ एप्रिल रोजी तर बाबुर्डी बेंद सोसायटीसाठी दि.४ एप्रिल रोजी सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे.

मतमोजणी मतदान संपल्यानंतर लगेच सुरु होणार असून ती संपल्यावर निकाल घोषित केला जाणार आहे. नगर तालुक्यातील २ सोसायट्यांबरोबरच श्रीगोंदे तालुक्यातील सुरेगाव आणि घोटवी सोसायटीची निवडणूक प्रक्रियाही सुरु झाली आहे. सुरेगाव साठी २ एप्रिलला तर घोटवी साठी ४ एप्रिलला मतदान होणार आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24