आता राज्यातील आस्थापनांच्या पाट्या असणार मराठीत; ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय, वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हटले कि सर्वाना आठवते मराठी अस्मिता. याचा भूमिकेला अनुसरून राज्य सरकारने आता एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे,

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तो म्हणजे राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनावरील पाट्या मराठीत करण्याचा. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी दिनांक १२ रोजी पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवली. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

Advertisement

त्यापैकी एक महत्वाचा आणि मराठी माणसाच्या अस्मितेचा निर्णय म्हणजे राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनांचे फलक हे मराठी भाषेत असावे.

१० कामगारांपेक्षा कमी असलेल्या आस्थापनांना देखील मराठी पाट्या बंधनकारक असल्याची माहिती कामगार विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

दरम्यान राज्यसरकारने घेतलेला हा निर्णय जरी मराठी माणसाच्या अस्मितेचा असला, तरी या निर्णयासंदर्भात हिंदी भाषेचे प्रभुत्व असलेल्या जिल्ह्यात याबद्दल नेमके काय पडसाद उमटतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Advertisement

विशेषतः विदर्भातील जिल्ह्यामध्ये या निर्णयाचे कसे पडसाद उमटतात हे येत्या काळात दिसून येणार आहे. सरकारच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर मात्र चांगलीच चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे.

काही या निर्णयाचे स्वागत करत आहेत, तर काहींकडून याचा विरोध दर्शविला जात आहे. त्यामुळे आगामी काळात या निर्णयाची अंबलबजावणी कशी होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Advertisement