आता ‘त्यांना’ देखील मिळणार वेतन!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-  राज्यातील प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक, अघोषित,अंशत : विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांना वेतन मिळावे यासाठी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ.डॉ.सुधीर तांबे यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश मिळाले आहे.

राज्य सरकारने हा निधी तातडीने मंजूर केला असल्याने आता या विना अनुदानित शाळांमधील शिक्षकांना वेतन मिळणार असल्याची माहिती आ.डॉ.तांबे यांनी दिली आहे.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, अंशत : विनाअनुदानित शाळांचा प्रश्‍न मिटावा यासाठी मागील ४७ दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर शिक्षक संघटनांचे आंदोलन सुरु होते. या आंदोलनाच्या सुरुवातीपासून आ.डॉ.तांबे या प्रश्‍नांसाठी ठाण मांडून होते. यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ही पुरवणी मागणी मंजूर झाली.

परंतू शासनाने हा निधी वितरीत करण्याचा अध्यादेश काढला नव्हता. त्यावर आ.डॉ.तांबे यांनी शालेय शिक्षण व वित्त विभागाचे प्रमुख अधिकारी यांचेकडे पाठपुरावा करुन आज विनाअनुदानित शाळांना २० टक्के व या शाळांना २० टक्के अनुदान आहे त्यांनी वाढीव २० टक्के म्हणजे ४० टक्के चा निधी वितरीत करण्याचा अध्यादेश मंजूर करुन घेतला.

यावेळी आ.डॉ.तांबे म्हणाले कि, शिक्षण व्यवस्था ही समाज बदलण्याचे प्रभावी माध्यम आहे. ग्रामीण भागात, आदिवासी भागात, वाडीवस्तीवर अनेक शिक्षक वर्षानुवर्षे विनावेतन काम करत आहेत.

त्यांची मागणी रास्त आहे. या निर्णयामुळे ६६ हजार शिक्षकांसमवेत त्या शाळांतील विद्यार्थ्यांना ही त्यामुळे गुणवत्तेचा फायदा होणार आहे. यापुढे ही अघोषित शाळांचा प्रश्‍न, पायाभूत वाढीव पदांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी आपण पाठपुरावा सुरु ठेवणार असल्याचे ही ते यावेळी म्हणाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24