अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्य नागरिक एकमेकांना आधार देण्याचे काम करीत आहेत. शासनाच्या माध्यमातून कोरोनाची लाट आटोक्यात यावी, यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जात आहेत.
हॉस्पिटलकडून कोरोनाग्रस्तांकडून आर्थिक लूट होऊ नये, यासाठी उपचाराचे शासकीय दर निश्चित करण्यात आले आहेत. एखादे दुसरे हॉस्पिटल सोडले, कोणीच रुग्णाकडून शासकीय दराने पैसे घेतले नाहीत.
हॉस्पिटलकडून सुरू असलेली ही नियमबाह्य आर्थिक लूट थांबावी, त्याला आळा बसावा, या उद्देशाने प्रांत ग्राहक संरक्षण परिषद समितीने पुढाकार आहे. ही समिती pकरणार्या हॉस्पिटलची पोलखोल करणार असल्याचे समितीचे जिल्हाध्यक्ष बद्रिनाथ चिंधे यांनी सांगितले.
पारनेर तालुक्यातील सुपा येथील एक जण नगरमधील एका हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल झाले. परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्या मित्रपरिवाराने पैसे जमा करून त्यांना मदत केली. हॉस्पिटलने नियमबाह्य बिल लावून पैसे लाटण्याचा प्रयत्न केला.
यासंदर्भात त्या रुग्णाने प्रांत ग्राहक संरक्षण परिषद समितीशी संपर्क करून वरील प्रकार लक्षात आणून दिला. नंतर परिषदेच्या पदाधिकार्यांनी बिलाची शहानिशा करीत ‘त्या’ हॉस्पिटलने जास्तीचे लावलेले ४० हजार रुपयांचे बिल करून करून देण्याकामी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
परिषदेकडे (टाकळी खातगाव), (रेणुकानगर, बोल्हेगाव फाटा), (पाथर्डी) येथील नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यांच्या बिलांची शहानिशा करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न परिषद करीत आहे.
समितीच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मागील सव्वा वर्षांपासून कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्किल होत असताना अशा प्रकारची लूट करणे ही खूप क्लेशदायक व लाजिरवाणी गोष्ट आहे.