आता ‘त्या’ बहुचर्चित बँकेच्या निवडणुकीत देखील महिला उतरणार!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- प्रत्येक वार्षिक सभेत हाणामारी, अंडे फेकणे, चपला फेकणे, गोंधळ करणे यामुळे सर्वसामान्य सभासदांची बदनामी तर झालीच झाली, पण काही सभासदांना तुरुंगाची देखील हवा खावी लागली आहे.

या सर्व प्रकारास सर्वसामान्य सभासद व महिला भगिणी कंटाळून सभेला उपस्थिती दाखवण्याचे टाळत होत्या. यासाठी हे सर्व अनिष्ट प्रथा, गोंधळ बंद होऊन समाजात शिक्षकाची मान उंचावेल यासाठी साजिर महिला मंडळ शिक्षक बँकेच्या आगामी निवडणुकीत भाग घेणार असल्याचे साजिर महिला मंडळाच्या अध्यक्षा मिनल शेळके यांनी म्हटले आहे.

त्यामुळे आता आगामी काळात आपल्याला प्राथमिक शिक्षक बँकेत वेगळेच चित्र पाहायला मिळेल. जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचा संचालक मंडळाचा कार्यकाल संपला असून लवकरच शिक्षक बँक निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे. मात्र आता या रणधुमाळीत अहमदनगर जिल्ह्यातील महिला देखील संपूर्ण ताकदीने उतारणार आहे.

बँकेत महिला सभासदांना उमेदवारी देऊन बँकेचा कारभार सभासद हिताचा व शिक्षकांची समाजात पत निर्माण करण्यासाठी महिला सभासदांचे पॅनल देऊन निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे मत साजिर महिला मंडळाच्या अध्यक्षा मिनल शेळके यांनी व्यक्त केले आहे.

शिक्षक बँकेची स्थापना होऊन एकशे एक वर्ष पूर्ण झाली आहेत. परंतु निवडणुकीच्या निमित्ताने कोणत्याच मंडळाने संपूर्ण महिलांचे पॅनल देण्याचे धाडस केले नाही. आजपर्यंत प्रत्येक बँकेच्या पंचवार्षिक कारभारात भ्रष्टाचाराचे गालबोट संचालक मंडळास लागले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24