अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :-तौक्ते चक्रीवादळानंतर आता ‘यास’ वादळाचे संकट घोंघावत आहे. 24 मे पर्यंत या वादळाची चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे.
हा धोका लक्षात घेता केंद्राने आंध्रप्रदेश, ओडिशा, बंगाल, तामिळनाडू आणि अंदमान निकोबारला अलर्ट केले आहे.केंद्रानुसार 26 मे रोजी वादळ बंगालच्या किना-यावर धडकेल.
कोविड रुग्णांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी तयारी करण्याचे केंद्राने पाचही राज्यांना सांगितले आहे. सर्व हॉस्पिटलमध्ये पुरेसा पॉवर बॅकअप ठेवावा, असेही सांगण्यात आले आहे.
किनारी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हॉस्पिटल आपत्ती व्यवस्थापन योजना सुरू करा. या जिल्ह्यातील रुग्णालयांमधील आपतकालीन परिस्थिती तयारीचा आढावा घ्यावा.
जे ठिकाण वादळाच्या मार्गावर येत आहेत, अशा ठिकाणावरील सामुदायिक वैद्यकीय केंद्रे आणि रुग्णालयांमधून रुग्णांना उंच ठिकाणावरील मोठ्या रुग्णालयात हलवण्यासाठी अॅडव्हान्स प्लॅन तयार करा.
कोविड व्यवस्थापनासाठी देखरेखीचे युनिट, आरोग्य संघटनांनी साथीच्या रोगाव्यतिरिक्त डेंग्यू, मलेरिया, सर्दी-खोकला, यासारख्या आजारांसाठी देखील तयार राहावे.
चक्रीवादळग्रस्त भागातील कोविड केंद्रांसह सर्व आरोग्य केंद्रे आणि रुग्णालयांमध्ये पुरेसे मनुष्यबळ असले पाहिजे. ही सर्व केंद्रे पूर्णपणे कार्यरत असणे आवश्यक आहे, असा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.