अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- सर्वसामान्य नागरिकांची पायपीट थांबावी तसेच त्यांना अधिकाधिक सुविधा घराजवळ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने हे मोठं पाऊल उचललं आहे.
यानुसार आता तुम्ही रेशन दुकानातही पासपोर्ट आणि पॅन कार्डसाठी अर्ज करू शकता. इतकंच नाही, तर वीज आणि पाण्याचं बिलदेखील रेशन दुकानांमध्ये स्विकारले जाणार आहे.
CSC केंद्र स्वतः सेवा निवडतील – अन्न मंत्रालया च्या या निर्णयामुळे, सीएससी सेवांचा पुरवठा रास्त भाव दुकान विक्रेत्यांमार्फत केल्याने रेशन दुकानांसाठी व्यवसायाची संधी आणि उत्पन्न वाढेल.
अधिकृत निवेदनात म्हटले आहे की रेशन दुकाने सीएससी सेवा केंद्र म्हणून विकसित केली जाऊ शकतात. अशा CSC केंद्रांना त्यांच्या सोयीनुसार अतिरिक्त सेवा निवडण्यास सांगितले जाईल.
निवडणूक आयोगाशी संबंधित सेवाही मिळणार – रेशन दुकानांमध्ये पासपोर्टसाठी अर्ज, पॅन कार्डसाठी अर्ज, लाईट बिल भरणे, पाण्याचं बिल भरणे आणि निवडणूक आयोगाशी संबंधित कामांची सुविधादेखील उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे.
या सुविधांचा सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच उपयोग होणार असून या कामांसाठी करावी लागणारी पायपीट कमी होणार आहे. या सुविधा इतरत्रही उपलब्ध आहेत, मात्र त्यात आता आणखी एका पर्यायाची भर पडणार आहे. रेशन दुकानधारकांचं उत्पन्न वाढायलाही या निर्णायामुळे मदत होणार आहे.