आता तुम्हीच सांगा आम्ही काय करावे..? ना पाऊस..ना पाणी…..ना हातात पिकं

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :-  पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत सापडला आहे. पाऊस नाही…पाणी नाही..हातात पिकं नाही असे विदारक चित्र तालुक्यात पाहवयास मिळत आहे.

पावसाच्या सुरुवातीला तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला होता. आहे त्या ओलीवर शेतक-यांनी मुग, बाजरी, सोयाबीनची पेरणी केली. सर्वाधिक पेरणी मुगाची झाली. तालुक्यात सरासरी ६५ टक्के पेरणी झाली. परंतु पावसाने हुलकावणी दिल्याने मुगाला फुलं आली पण गळुन गेली.

शेंगांमध्ये दाणेच भरले गेले नाही. तीच परिस्थिती सोयाबीन व बाजरी बाबत झाली. बाजरी फुला-यात आली परंतु पाण्याअभावी कणसांनी दाणेच भरले गेले नाही.

उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. परंतु खर्च तर आहे तेवढा करावाच लागणार आहे. उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसणार नाही. शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24