Post Office Issued New Plan : आता महिन्याला मिळतील 2500 रुपये, असा घ्या ‘या’ योजनेचा लाभ

Post Office Issued New Plan : अनेकजण पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करतात. कारण यामध्ये कोणतीही जोखीम नसून परतावाही भरघोस मिळतो. पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन योजना राबवत असते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशीच एक योजना आहे. मात्र ही योजना मुलांसाठी आहे. या योजनेत जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हला महिन्याला 2500 रुपये मिळतील.ही रक्कम तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरू शकता.

हे विशेष खाते ज्या मुलांचे वय 10 वर्षांपेक्षा जास्त असेल त्यांनाही उघडता येते. जर तुम्ही हे खाते उघडले तर तुम्हाला तुमच्या मुलांच्या शाळेच्या फीची काळजी करण्याची गरज नाही.

Advertisement

जाणून घ्या योजनेबद्दल

तुम्हाला हे खाते उघडायचे असेल तर कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये ते उघडू शकता. तुम्हाला यामध्ये किमान 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये जमा करता येतात.

याचे व्याज 6.6 टक्के इतके असून तुमच्या मुलाचे वय 10 वर्षांपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही हे खाते त्याच्या नावावर उघडू शकता. हे लक्षात घ्या की ही योजना केवळ 5 वर्षांसाठी असणार आहे, त्यानंतर ही योजना बंद केली जाईल.

Advertisement

असे मिळतील पैसे

  • समजा तुमच्या मुलाचे वय 10 वर्ष असेल आणि तुम्ही त्याच्या नावावर 2 लाख रुपये जमा केले तर 6.6 टक्के व्याज दराने तुमचे दरमहा व्याज रु. 1,100 इतके असेल.
  • एकूण पाच वर्षांत हे व्याज एकूण 66  हजार रुपये असेल . शेवटी तुम्हाला 2 लाख रुपयांचा भरघोस परतावा देखील मिळतो.
  • एका लहान मुलासाठी 1100 रुपये मिळतील, ही रक्कम तुम्ही त्याच्या शिक्षणासाठी गुंतवू शकता.
  • हेदेखील लक्षात घ्या की तुम्ही 4.5 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला दरमहा सुमारे 2500 रुपये मिळतील.

त्यामुळे जर तुम्हाला सुरक्षित आणि भरघोस नफा मिळवायचा असेल तर पोस्टाच्या या योजनेचा ताबडतोब लाभ घेऊन आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करा.

Advertisement