अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी देशातील पहिले सीएनजी ट्रॅक्टर भारतात लॉन्च केले. हे ट्रॅक्टर रोमॅट टेक्नो सोल्यूशन आणि टोमॅसेटो एकाइल इंडिया यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे. यामुळे शेतकर्यांना आपला खर्च कमी करून त्यांचे उत्पन्न वाढविण्यात मदत होईल.
ट्रॅक्टर लॉन्च करताना गडकरी यांनी सांगितले की आता शेतकरी जुन्या ट्रॅक्टरमध्येही सीएनजी किट बसवू शकतील. याबाबत सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाईल. ते म्हणाले की, शेतीत ट्रॅक्टर वापरण्यासाठी तासाला सरासरी 4 लिटर डिझेल लागते आणि त्याचा खर्च प्रति लिटर 78 रुपये प्रमाणे 312 रुपये होईल.
त्याचबरोबर सीएनजी ट्रॅक्टर चालविण्यासाठी 4 तासात सुमारे 180 रुपये खर्च अपेक्षित आहे. एका अंदाजानुसार शेतकऱ्यांना वर्षाकाठी 1 लाख रुपयांचा फायदा होईल.
रस्ते वाहतूक मंत्रालयाने सीएनजी ट्रॅक्टरचे मानक निश्चित केले आहेत. यानुसार बाजारपेठेत ट्रॅक्टर उपलब्ध होतील.टीक्टरमध्ये सीएनजी किट बसविण्यात येणार असून यामुळे शेतीचा खर्च कमी होईल. ट्रॅक्टर लॉन्च करतांना नितीन गडकरी म्हणाले की, सीएनजीच्या इतर वाहनांप्रमाणे सुरुवातीला ते सुरू करण्यासाठी डिझेलची गरज भासू शकेल. यानंतर ते सीएनजी वरून चालतील.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की मेक इन इंडिया अंतर्गत सीएनजी किट तयार केले आहेत. ते म्हणाले की शेतीमध्ये वापरली जाणारी इतर साधनेही बायोसीएनजीमध्ये रूपांतरित करण्याची योजना आहे.
बायो-सीएनजी स्वस्त बसेल –
7 किलो मटेरियलपासून 1 किलो बायोसीएनजी तयार करता येतो. ते तयार करण्यासाठी सुमारे 15 रुपये प्रति किलो खर्च येईल. मटेरियलचा खर्च सुमारे 1200 ते 1500 टनच्या हिशोबाने 10 रुपये येईल. अशा प्रकारे बायोसीएनजीची किंमत सुमारे 25 रुपये किलोवर येईल.
रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या मते सध्या तरी सीएनजी मार्केट दरामध्ये उपलब्ध असेल, परंतु बायोसीएनजीचा उपयोग यशस्वी झाल्यास त्याचा वापर वाढेल. हे प्लांट जागोजागी स्थापित झाल्यानंतर प्लांट मध्ये ते बाजारापेक्षा स्वस्त उपलब्ध होईल.