अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-देशात गत २४ तासांत तब्बल ३ लाख ९२ हजार ४८८ नवे रुग्ण आढळल्याने यापूर्वीचे सर्व विक्रम मोडित निघाले आहेत.
यासोबतच ३, ६८९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने देशातील एकूण मृतांची संख्या २ लाख १५ हजार ५४२ झाली आहे. रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या या आकडेवारीनुसार गत २४ तासात ३ लाख ०७ हजार ८६५ रूग्ण बरे झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
देशातील बाधितांची संख्या १ कोटी ९५ लाख ५७ हजार ४५७ झाली आहे. दोन कोटीच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या या आकड्याने देशातील परिस्थिती स्पष्ट होते आहे.
रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ३३ लाख ४९ हजार ६४४ झाली असून, ही संख्या एकूण बाधित रुग्णांच्या तुलनेत १७.१३ टक्के आहे. कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.७७ टक्क्यापर्यंत खाली आले.
कोरोनावर मात करणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या १ कोटी ५९ लाख ९२ हजार, २७१ झाली आहे. देशातील मृत्युदर १.१० टक्क्यापर्यंत खाली आला आहे.
१ ‘मे’पर्यंत देशभरात २९ कोटी १ लाख, ४२ हजार, ३३९ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून. यातील १८ लाख ०४ हजार ९५४ लोकांची शनिवारी चाचणी करण्यात आल्याचे नमूद केले.