Numerology: व्यक्तीचे आयुष्य आणि ज्योतिषशास्त्र यांचा खूप निकटचा संबंध असून ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रह ताऱ्यांचा व्यक्तीच्या आयुष्याशी असलेला संबंध प्रामुख्याने विशद केला जातो. यामध्ये संबंधित व्यक्तीची जन्मतारीख, जन्माची वेळ तसेच वार इत्यादी गोष्टींना खूप महत्त्वाचे स्थान असते.
या सगळ्या बाबींवरून ज्योतिष शास्त्रामध्ये त्या व्यक्तीचे आयुष्य कसे राहील किंवा ते व्यक्ती आयुष्यात कसे जगते इत्यादीबद्दल सविस्तर माहिती आपल्याला कळत असते. अगदी याचप्रमाणे जर तुम्ही ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर व्यक्तीची जन्मतारीख देखील ग्रहाची संबंधित असते व जन्म तारखेपासून जो काही व्यक्तीचा मुलांक असतो त्यानुसार देखील व्यक्तीचे जीवन व त्याचे भविष्य कसे राहील हे आपल्याला ओळखता येते.
या मुलांकावरून व्यक्तीच्या जीवनाबद्दल बरेच काही आपल्याला माहीत करून घेता येते. यामध्ये अंकशास्त्र ही महत्त्वाची संकल्पना असून यामध्ये एक ते नऊ पर्यंतच्या अंकांचा समावेश होतो व हे नवग्रहांशी संबंधित असतात. अंकशास्त्रानुसार या नऊ ग्रहांचा त्या त्या मुलांक असलेल्या व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होत असतो. यावरून या लेखांमध्ये मुलांक दोन असलेल्या व्यक्ती कशा असतात व प्रामुख्याने दोन मुलांक असलेल्या मुली आयुष्य कशा पद्धतीने जगतात किंवा त्यांचे भविष्य कसे असते? इत्यादी बद्दल आपण माहिती बघू.
मुलांक 2 असलेल्या मुलींचे व्यक्तिमत्व कसे असते?
ज्या मुलींचा किंवा ज्या लोकांचा जन्म महिन्याच्या दोन, 11, 20 आणि 29 तारखेला होतो त्या व्यक्तींचा मुलांक हा दोन असतो. मुलांक दोन असलेल्या मुलींचे व्यक्तिमत्त्व हे…
1- दोन मुलांक असलेल्या मुली या खूप हुशार असतात आणि कुटुंबाची सर्व पद्धतीने काळजी घेण्यासाठी त्या सक्षम असतात.
2- आपला पती आणि कुटुंबाच्या आनंदाची काळजी कशी घ्यावी हे मुलांक दोन असलेल्या मुलींना चांगल्या प्रकारे माहिती असते.
3- मुलांक दोन असलेली मुलगी एक चांगली सून देखील असते व महत्त्वाचे म्हणजे ती तिच्या पतीला प्रत्येक पावलावर साथ देते. म्हणजेच पत्नीची भूमिका ती चांगल्या पद्धतीने पार पाडते.
4- कुटुंब आणि घर सांभाळण्याच्या बाबतीत या मुली खूप पुढे असतात. पूर्ण घर म्हणजेच कुटुंब कशा पद्धतीने सांभाळायचे हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहीत असते.
5- विशेष म्हणजे दोन मुलांक असलेल्या मुली नातेसंबंधांना खूप महत्त्व देतात व प्रत्येक नाते जपण्यामध्ये मोलाची भूमिका पार पाडतात.
अशाप्रकारे मूलांक दोन असलेल्या मुली या कुटुंबासाठी आणि एकंदरीत तिच्या संपूर्ण आयुष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने जगतात व इतरांना मदत करतात.