अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-कोरोना विषाणूविरोधात संपूर्ण जग लढा देत आहे. कोरोना रुग्णांची सेवा करून त्यांना बरे करण्यात परिचारिकांचा महत्त्वाचा वाटा आहे.
या परिचारिका म्हणजे कोरोना विरुद्धच्या लढ्यातील प्रमुख योद्ध्या आहेत, असे प्रतिपादन स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी केले.
जागतिक परिचारिका दिनानिमित्त अहमदनगर छावणी परिषद हॉस्पिटलमधील परिचारिकांचा स्नेहबंध फाउंडेशन च्या वतीने शिंदे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
त्यावेळी ते बोलत होते. शिंदे म्हणाले, रुग्णसेवेत प्रमुख भूमिका बजावणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो.
कोरोना संकटकाळात परिचारिका कोरोना योद्धा बनून अहोरात्र रुग्णसेवा करत आहेत. सर्व परिचारिकांना कोरोना बरोबर लढण्यासाठी एक युद्धच उभे राहिले आणि ते आपल्या परिचारिका खूप उत्तम रित्या पार पडत आहे. त्यामुळे हे वर्ष परिचारिकांना समर्पित करण्यास योग्यच आहे.
घरापासून दूर राहून या कोरोना योद्धा जीवानिशी हे युद्ध लढत आहे. काही परिचारिका आपल्या लहान मुलांना सोडून या युद्धात उतरल्या आहेत. त्यांच्या कार्याला सलाम.