मतदार जागृती अभियानांतर्गत मतदानाचे हक्क बजावण्याची शपथ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- मतदान राष्ट्रीय कर्तव्य म्हणून केलेच पाहिजे. सदृढ लोकशाहीसाठी मतदान प्रक्रियेत सहभागी होणे गरजेचे आहे. जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला आपला देश आहे.

परंतु मतदानाची टक्केवारी सरासरी 60 टक्के पर्यंत दिसून येते. हे चित्र बदलण्यासाठी मतदान प्रक्रियेत मतदारांनी सक्रीय सहभाग घेतला तर सदृढ व समृद्ध लोकशाहीची निर्मिती होणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचे (नवी दिल्ली) अहमदनगर जिल्हाध्यक्ष तथा जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे यांनी केले.

अहमदनगर जिल्हा प्रशासन, जिल्हा निवडणूक विभाग, नेहरू युवा केंद्र, जय स्वयंसेवी संस्था संघटन व जय युवा अकॅडमीच्या वतीने मुळा नगर येथे मतदार जागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी अ‍ॅड. शिंदे बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. भानुदास होले, अ‍ॅड. अनिता दिघे, पोपट बनकर, संतोष गिर्‍हे,

वैशाली कुलकर्णी, आरती शिंदे, नैना बनकर, सिमोन बनकर, अशोक कासार, रजनी ताठे, वंदना थोरवे, प्रसाद भडके, संगीता पगारे, मुमताज मडकेश्‍वर, दिनेश शिंदे, अ‍ॅड. गौरी सामलेटी, नमिता नरसाळे आदींसह परिसरातील बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

प्रारंभी अ‍ॅड. अनिता दिघे यांनी संस्था प्रतिनिधी व महिलांना मतदान शंभर टक्के करणार, कोणत्याही प्रलोभन, आमिष व दबावाला बळी न पडता मतदान करणार असल्याची शपथ दिली. अ‍ॅड. भानुदास होले यांनी महिलांना मतदान प्रक्रियेत पुढाकार घेतला पाहिजे.

कुटुंबाचे व गावाचे मतदान शंभर टक्के होईल यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. मतदानाची टक्केवारी वाढल्यास योग्य लोकप्रतिनिधी निवडून येईल यामुळे विकास साधला जाणार आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण होत आहे.

मात्र महिलांनी देखील लोकशाहीचे समक्षमीकरणासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील व नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात यांचे मार्गदर्शन लाभले.

अहमदनगर लाईव्ह 24