ओबीसी समाजाच्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावे- खा.विखे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी विरुद्ध खुल्या गटातील उमेदवार अशा लढती होऊन, जातीय व सामाजिक तेढ वाढणार आहे.

त्यामुळे ओबीसी समाजाच्या मंत्र्यांनी राजीनामे देऊन, समाजाच्या पाठीशी राहण्याची हिंमत दाखवावी. असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी दिले.

आज शनिवारी राहुरी येथे बसस्थानक चौकात महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ भाजपातर्फे चक्काजाम आंदोलन प्रसंगी खासदार डॉ. विखे-पाटील बोलत होते. माजी आमदार शिवाजी कर्डिले,

कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे, उपाध्यक्ष दत्तात्रेय ढूस, तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, सुभाष गायकवाड, रवींद्र म्हसे, सुरसिंग पवार, शिवाजी सोनवणे, चाचा तनपुरे, श्यामराव निमसे, प्रकाश पारख उपस्थित होते.

खासदार डॉ. विखे-पाटील म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर फेरविचार याचिका दाखल करू. असे एकाही मंत्र्याने म्हंटले नाही. हे दुर्दैवी आहे. शासनाने वीज तोडली. दुध दर कोसळले.

राहुरी तालुक्यात मागील आठ वर्षात सर्वाधिक अवैध वाळू उपसा मागील दोन-तीन महिन्यात झाला. हप्ता, टक्केवारीमुळे राहुरीचे चित्र बदलले. राहुरी पालिकेतील भ्रष्टाचारावर बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जातो.”

माजी आमदार कर्डिले म्हणाले, “जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका सदस्याच्या संधीतून ओबीसी समाज वंचित राहणार आहे. राज्य सरकार कोरोनाच्या संकटात अपयशी ठरले. कोरोना रुग्णांच्या मृत्यूस राज्य सरकार जबाबदार आहे.

नगर येथे आज चक्काजाम आंदोलन झाल्यावर मला खासदार डॉ. विखे-पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंम्ही जामीन देणार नाही. असे सांगितल्यावर आंम्हाला सोडले.” असेही कर्डिले यांनी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24