अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :-विरोधकांच्या काड्या आणि खोड्या विकासात सतत बाधा ठरतात. विकास कामांना प्राधान्य देत मागील प्रस्ताव मार्गी लावून मतदारसंघाचा नावलौकिक राज्यात वाढवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करू, अशी ग्वाही भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी दिली.
जळगाव ते चितळी या रस्त्याच्या कामाचे लोकार्पण त्यांनी केले.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून १ कोटी ६० लाख ५१ हजार रुपये खर्चाचे लोकार्पण, भाजप बुथ संपर्क अभियान सुरू केले. यावेळी त्या बोलत होत्या. बाळासाहेब चौधरी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
अध्यक्ष म्हणून माजी ग्रामपंचायत सदस्य बेबी निर्मळ उपस्थित होत्या. गंगाधर चौधरी, भाऊसाहेब चौधरी यांनी प्रास्तविक केले. चिपळूण पूरग्रस्त व कोरोनामुळे दिवंगत झालेल्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी कोरोना योध्दे डाॅ. राजेंद्र शिंदे, सुरेश गवई, मिरा कापरे, मनीषा सिनगारे, सविता कापरे,
स्वाती बोरावके, अर्चना साळुंके, सुनीता गिते, सोनाली वैराळ, द्रौपदी शिंदे, मिराबाई काळे, आरती वैद्य, सुनीता साप्ते, अरुणा वानखेडे, अलिमा शेख, पुष्पा आंबड, परवीन शेख, संगीता वैराळ आदींचा कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, गावगाडा चालवताना प्रत्येकाला कसरत करावी लागते. आपण प्रामाणिक राहून जनतेच्या विकासाचे प्रश्न सोडवले.
पण श्रेयवाद लाटण्यासाठी भलतेच आले, याचे दुःख वाटते. विजय महाराज चौधरी यांनी युवा नेते विवेक कोल्हे यांच्या संजीवनी कोविड व आॅक्सिजन सेंटरच्या माध्यमांतून हजारो कोरोनाग्रस्तांवर मोफत उपचार केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. सूत्रसंचालन बाळासाहेब चौधरी व सुभाष जामदार यांनी केले.