अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- कोपरगाव नगरपरिषदेच्या सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी पुन्हा एकदा बहुमताच्या जोरावर सर्वसाधारण सभेत बांधकाम विभागाचे सर्व विषय नामंजूर करून शहरविकासासाठी खोडा घालण्याचे काम केले आहे.
तर दुसरीकडे आमचा शहर विकासाला कोणताही विरोध नसून विकासाच्या नावाखाली चालू असलेल्या भ्रष्टाचाराला आमचा विरोध आहे.
म्हणून सर्वसाधारण सभेत विषय नामंजूर केले असून माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या नावाने खडे फोडणार्यांनी निधी वापरून एकही फलकावर कोल्हे यांचे नाव लावले नाही.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष व नगरसेवक संदीप वर्पे म्हणाले कि, प्रत्येक कामात त्यांना भ्रष्टाचाराचा वास वाटतो. शहर विकास झाला तर याचे सर्व श्रेय आ.आशुतोष काळे यांना जाईल या भीतीपोटी शहरातील मुख्य रस्त्यांच्या कामाला खोडा घातला आहे. माजी आमदार स्नेहलता कोल्हे भाजप नगरसेवकांच्या माध्यमातून शहरातील जनतेचा बदला घेत आहे
अशी टीका वर्पे यांनी केली. यावेळी वर्पे म्हणाले की, अंदाजे साडे आठ कोटी रुपयांचा निधी परत जाण्याची शक्यता आहे. या रस्त्यांना निधी 14 व्या वित्त आयोगाचा असून त्याची मुदत संपली आहे.
त्यामुळे याचे फेर अंदाजपत्रक बनवणे म्हणजे जवळपास आठ कोटींचा निधी गमावणे होय.त्यामुळे हा ठराव नामंजूर करू नये अशी रास्त मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी म्हंटले आहे कि, आम्हाला राजकारण करायचे नाही.
गुलाब फुले वाटून नौटंकी कारायचे कामे सुरू असून सोलर पॅनल वर लाईट लावण्यापेक्षा विकासाचे दिवे लावा असा टोला त्यांनी नगराध्यक्ष विजय वहाडणे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांवर केली आहे.