अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगत तक्रारदाराच्या वडिलांच्या गळ्याचा थायरॉईड कॅन्सर बरा करतो, असे सांगून २ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी उंदरगाव (ता. करमाळा) येथील मनोहरमामा भोसले याच्यावर बारामती पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात झाला आहे.

दुसऱ्या प्रकरणात सोलापूर येथे एका महिलेवर अत्याचार केल्यावरून भोसले याच्यावर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात बुधवारी गुन्हा नोंदवण्यात आला. शशिकांत खरात यांनी याप्रकरणी ऑगस्ट २०१८ मध्ये पहिली तक्रार दिली होती.

मात्र गुन्हा ९ सप्टेबर २०२१ रोजी बारामती ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. खरात यांचे वडील सुभाष बबन खरात यांना गळ्याच्या डाव्या बाजूस गाठ असल्याने त्रास होऊ लागला.

त्याची तपासणी केल्यानंतर ही गाठ कॅन्सरची असल्याचे निदान झाले. आजार बरा करण्यासाठी मनोहरमामांन एक लाख रुपयाचा चढावा ठेव, नाही तर तुझ्या वडिलांसह तुझ्या जीवाला धोका आहे,

अशी भीती घातली. तक्रारदारानी मनोहरमामाच्या पायावर सव्वा लाख रुपयांचा चढावा केला. तरीही प्रकृतीत सुधारणा झाली नाही.