बेकायदेशीर दारू प्रकरणी अधिकारी सापडले अडचणीत ; कारवाईची टांगती तलवार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला येथील बेकायदेशीर देशी दारू दुकान प्रकरणामुळे राज्य उत्पादन शुल्कचे काही कर्मचारी चांगलेच गोत्यात आले आहे.

या प्रकरणातील बनवाबनवी समोर आल्याने आता कारवाईची टांगती तलवार अधिकाऱ्यानावर आली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला येथील देशी दारूचे दुकान हे चांगलेच चर्चेचा विषय बनला होता.

या दुकान मालकाने खोटे कागदपत्र सादर करून दारूच्या दुकानासाठी परवाना मिळवला होता. ग्रामपंचायतीने एकही ना हरकत प्रमाणपत्र दिले नसतानाही या दुकानाला परवाना मिळाला कसा? या दुकानाबाबत अनेक तक्रारी झाल्याने ग्रामपंचायतीसह राज्य उत्पादन शुल्क खाते खडबडून जागे झाले आहे.

ग्रामपंचायतीने या दुकानाला नोटीस देऊन दुकान बंद करावे अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. दरम्यान दुकान मालकाने भूमि अभिलेख कार्यालयाचे खोटा दाखला सादर करून परवाना मिळवला असल्याचे उघड झाले आहे.

हा दाखला बनवून देण्यात स्थानिक अधिकार्‍यांसह उत्पादन शुल्कच्या कार्यालयातील पाच कर्मचार्‍यांचाही समावेश असल्याची चर्चा आहे. यामुळे या सर्वांवर खाते अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता वाढली आहे.

भुमिअभिलेख खात्यातील अधिकारी व दारू दुकानदार यांच्यात लागेबांधे असल्याची चर्चा असून यासंबंधी हे अधिकारी व कर्मचारी कुठल्याही कागदपत्रांची तपासणी न करता बोगस दाखले देत असल्याचे समोर आले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24