अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- अहमदनगरला पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप तयार करून आत्महत्येचा इशारा दिला आहे. या क्लिपमुळे पारनेरसह जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

दरम्यान या व्हायरल ऑडिओ क्लिपवर जयंत पाटील यांनी सूचक विधान केले आहे. निलेश लंके हे उत्तम काम करत आहे. गेल्या काही दिवसांत काही लोकांनी जाणीवपूर्वक त्यांच्याविरुद्ध प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

काही लोकांना मर्यादा सोडून वागायची सवय असते. जी चूक आहे ती चूक आहे, पण लोकशाहीत प्रत्येकाच्या मर्यादा ठरलेल्या आहेत. आमदाराला मर्यादा आहेत तशा अधिकाऱ्यांनाही मर्यादा असतात.

त्या मर्यादा सोडून वागू नये. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील चाळीगावच्या दौऱ्यावर आले आहेत. शनिवारी त्यांनी पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांची विचारपूस करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

त्यानंतर कार्यकर्त्याच्या दुचाकीवर बसून ते बिलदरी धरणाच्या दिशेने रवाना झाले. धरणाकडे जाणाऱ्या संपूर्ण रस्त्यावर चिखल झाला होता. चिखल तुडवत हा तीन किलोमीटरचा रस्ता मोठ्या कसरतीने पार करत जयंत पाटील यांनी बिलदरी धरण गाठून धरणाची पाहणी केली