अरे देवा ! संगमनेरात कोरोना रुग्ण ९ हजार पार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-संगमनेरात रविवारी ९८ रुग्णांची भर पडल्याने बाधित संख्या ९ हजार पार करत ९०८१ झाली.

शनिवारी १२३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. ८३३० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तर ५८६ बाधितांवर उपचार सुरु असून ६७ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

शहरातील बाधित संख्या २७२६ तर ग्रामीणची ६२५७ आहे. सर्वाधिक १९१९ बाधितांची मार्चमध्ये नोंद झाली. तालुक्यात रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत.

चिंता वाढल्याने प्रशासनाची धावपळ होत आहे. नियमांचे पालन होताना दिसत नाही. दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत आहे.

महसूल व पोलिस प्रशासनात समन्वय नाही. गर्दीवर नियंत्रण नसल्याने नियम कठोर करण्याची मागणी काही सुज्ञ नागरिक करत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|p
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24