अरे देवा! कोरोनापाठोपाठ ‘तो’ देखील हातपाय पसरतोय…?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :- कोरोनाने अवघ्या जगाला वेठीस धरले असून, आजुनही देशातील कोरोनाचा धोका कमी झालेला नाही.

कोरोनामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले तर अनेकांचे रोजगार गेल्याने त्यांचीअत्यंत बिकट परिस्थिती आहे. या संकटातून बाहेर पडत नाहीत तोच परत आणखी दुसरे संकट उभे ठाकले आहे.ते म्हणजे झिका या व्हायरसचे.

आता एकीकडे कोरोना तर दुसरीकडे झिका या दोन्हींच्या मध्ये सर्वसामान्य जनता जीवनाची लढई लढत आहे. दिवसेंदिवस झिका व्हायरसचा प्रादुर्भाव  वाढत असल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे.

केरळमध्ये झिका व्हायरसचे तब्बल १५ रुग्ण आढळून आले असल्याची  केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी  यासंदर्भात माहिती दिली. राज्यात झिकाचे रुग्ण वाढल्याने राज्य सरकार हाय अलर्टवर असून,

केरळमध्ये झिका व्हायरसचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी ॲक्शन प्लॅनवर काम केले जात आहे. केरळमध्ये झिका व्हायरसची लागण होणारी पहिली व्यक्ती गर्भवती महिला होती. महिला आणि तिचे बाळ बरे होत आहेत.

झिका व्हायरसचे सॅम्पल पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यातील १३सॅम्पल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर आनखी १४ सॅम्पल टेस्टसाठी पाठवले होत ते सर्व निगेटिव्ह आले असल्यचेही त्यांनी सांगीतले .

अहमदनगर लाईव्ह 24