अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- तुम्ही ‘माझ्या घरा समोर भांडण करू नका, असे म्हणाल्याचा राग आल्याने एका साठ वर्षाच्या महिलेवर चक्क कुऱ्हाडीने वार केल्याची घटना राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे घडली आहे. यात आरोपी देखील महिलाच आहेत हे विशेष.
याबाबत कुसूमबाई बाळासाहेब पवार यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, आरडगाव माझ्या घरासमोर भांडण चालू होते.
तेव्हा ‘तुम्ही माझ्या घरासमोर भांडण करु नका’ असे म्हणाल्याचा राग येवुन यातील आरोपींनी मला व लिलाबाई यांना शिविगाळ दमदाटी करुन हाताने मारहाण केली.
तसेच माझ्यावर कुऱ्हाडीने वार करून जखमी केले. यावरून अर्चना अनिल गायकवाड, गयाबाई केरु माळी, गयाबाई हिच्या मुली पुनम व सोनम यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.