अहमदनगर Live24 टीम, 12 जुलै 2021 :- ग्रामसेवक व त्यांचे कार्यालयीन सहकारी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये काम करत असताना अरुण गोपीनाथ वालघडे यांनी नळ पट्टीचे थकीत पैसे भरणार नाही, तुला काय करायचे ते करुन घे, अशी भुमिका घेत शासकीय कामात अडथळा आणून दमदाटी, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अकोले पोलिसांत ग्रामसेवक ताजणे यांनी फिर्याद दिली असून तीत म्हटले आहे, की तालुक्यातील केळी ओतूर येथील कार्यालयीन सहकाऱ्यासह ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शासकीय काम करत असताना,
आरोपी वालघडे याने नळपट्टी भरण्याच्या कारणावरून ग्रामपंचायत कार्यालयात येऊन शिवीगाळ व दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली.
तसेच शासकीय कर्तव्यामध्ये जाणीवपूर्वक अडथळा आणला. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक साबळे करत आहेत.