अरे बापरे ! सराफ व्यावसायिकाचे हात पाय बांधले अन…..ते देखील भरदिवसा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :-  सध्या राज्यात नेमके काय चालले आहे हेच कळायला मार्ग नाही. भर दिवसा चोरी, घरफोडी, अत्याचार, यासारख्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. नागपुरात भरदिवसा सोन्या चांदीच्या दुकानात बंदुकीच्या धाकावर दुकानदाराला बांधून मारहाण करून ओलीस ठेवत चौघांनी दरोडा टाकला.

या दरोडेखोरांपैकी एक जण ग्राहक बनून दुकानात आला. थोड्या वेळात दुसऱ्याने दुकानात प्रवेश करत दुकानदारावर बंदूक ताणली आणि तिसऱ्याने दुकानात प्रवेश करत शटर बंद केले दुकानदाराचे हात पाय बांधून त्याला मारहाण केली.

तर इतरांनी दुकानात असलेले चार लाख रुपये रोख आणि सोन्या चांदीचे दागिने लुटले. एक जण बाहेर पाळत ठेऊन होता. दुकानदार दुकानात एकटाच असल्याने आणि त्यांनी आधीच त्याला बांधल्याने तो काहीही करु शकला नाही

.भर वस्तीतील अगदी रस्त्यावर असलेले दुकान दरोडेखोर लुटत होते मात्र बाहेरून जाणाऱ्या येणाऱ्यांना त्याची भनक सुद्धा लागली नाही. पोलीस आता सीसीटीव्ही आणि इतर बाबींचा आधार घेत आरोपींचा शोध घेत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24