अरे बापरे! पीकअपमधील अडीच लाखावर अज्ञात चोरट्याचा डल्ला..!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका बोलेरो पिकचालकाला अज्ञात भामट्याने तब्बल अडीच लाख रुपयांचा चुना लावला आहे. ही घटना कर्जत तालुक्यातील तुकाई चारी जवळ घडली आहे.

या प्रकरणी भारत किसन ठेंगे यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार कर्जत पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, ठेंगे हे त्यांच्या बोलेरो पिकअप या वाहनातून मिरजगावकडून श्रीगोंद्याकडे जात होते. दरम्यान ते कर्जत तालुक्यातील तुकाई चारीजवळ काही कामानिमित्त थांबले होते.

नेमका याच संधीचा अज्ञात चोरट्याने फायदा घेत त्यांच्या पिकअप या वाहनातून २ लाख २६ हजार ६०० रुपये व ६ हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा मुद्देमाल लंपास केला.

अहमदनगर लाईव्ह 24