अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-नाराज होऊन माहेरी गेलेल्या पत्नीचा रूसवा दूर करण्यासाठी आपल्या सासरी जाणे चांगलेच महागात पडले आहे.
संतापलेल्या पत्नीने रात्री जवळ झोपलेल्या पतीवर हल्ला केला आणि ब्लेडच्या मदतीने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला.
हे कृत्य करून महिला फरार झाली आहे. ही खळबळजनक घटना यूपीतील कुशीनगर जिल्ह्याच्या रामपुर चौराहा हरबंश परिसरात घडली आहे.
गोविंदा कुमार असे त्या पीडित तरूणाचे नाव असून तो गोपालगंजच्याजवळच जमसडी गावात राहणारा असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.
आठ महिन्यापूर्वीच त्याचे विभा कुमारीसोबत लग्न झाले होते. लग्नानंतर सासरी मिळालेले दागिने घेऊन नववधू फरार झाली.
तब्बल ४० दिवसांनी गोविंदा कुमार तीला परत घरी घेऊन आला. पण ती पुन्हा काही दिवसांनी घर सोडून फरार झाली. नंतर ती कुशीनगरला तिच्या आईकडेच राहत होती.
तरूणाने सांगितले की, बुधवारी दुपारी पत्नीने फोन करून मला तिच्या घरी बोलवून घेतले व मला येथून सासरी घेऊन जा असे म्हणाली.
पत्नी येणार म्हटल्याने तो आनंदाने तिला घ्यायला गेला. २४ मार्चच्या रात्री पती-पत्नी दोघांनी एकत्र जेवण केल्यावर दोघे एकाच रूममध्ये झोपायलाही गेले.
झोपतेवेळी रात्री त्याच्या पत्नीने त्याचा प्रायव्हेट पार्ट ब्लेडने कापला आणि फरार झाली. आता पोलीस आरोपी महिलेचा शोध घेत आहेत.