अरे वा ! उद्यापासून ‘तो’ येतोय … ? बळीराजाचे ‘ते’ संकेत टळणार … !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :-  मागील काही दिवसापासून चिंताग्रस्त असलेल्या बळीराजासाठी एक आनंदाची बातमी आहे.  उद्यापासून  राज्यात सर्वदूर पाऊस पाडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे.

अरबी समुद्रात मोसमी पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली असून त्यासोबत बंगालच्या उपसागरातून कमी उंचीवरून जमिनीच्या दिशेने बाष्प येत असल्याने गुरुवारपासून कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे.

तर  १० जुलैपासून हाच पाऊस राज्यात सर्वदूर जोर धरण्याची शक्यता व्यक्त केलीआहे. सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली.

मात्र नंतर पावसाने दडी मारल्याने उगवण झालेली पिके सुकत होती. तर काही ठीकाणी पेरणीच झाली नव्हती मात्र पाऊस गायब झाल्याने दुबार पेरणीचे संकट असतानाच पावसाच्या सक्रियतेनंतर पाण्यासाठी आणि दुबार पेरणीचे संकट दूर होऊ शकणार आहे.

राज्याच्या सर्वच भागांमध्ये गेल्या दहा ते बारा दिवसांपासून मोसमी पाऊस शांत झाला होता. दोन दिवसांपासून तुरळक ठिकाणी पाऊस असला, तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. पावसाच्या दीर्घ विश्रांतीमुळे राज्याच्या बहुतांश भागातील पाणीसाठय़ांवर परिणाम दिसून येत आहे.

त्याचप्रमाणे जूनच्या अखेरच्या टप्प्यात खरिपाच्या पेरण्या झालेला शेतकरीही दुबार पेरणीच्या संकटाच्या टांगत्या तलवारीमुळे चिंतेत आहे. पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिल्यामुळे काही प्रमाणात दिलासा व्यक्त केला जातो आहे.

हवामान खात्याच्या इशाऱ्याप्रमाणेच काही ठिकाणी पाऊस सुरु झालाय. असल्याची माहिती  भारतीय हवामान विभागाच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटरवरुन दिली आहे .

अहमदनगर लाईव्ह 24