अरे बापरे.… एक महिन्यापूर्वीच हजर झाला अन लाचलुचपतच्या जाळ्यात अडकलाही …!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- अवघ्या एक महिन्यापूर्वीच संगमनेर येथील वन कार्यालयात रुजू झालेला सहाय्यक वनसंरक्षक विशाल किसन बोराडे याला ४० हजारांची लाच घेताना लाचलुचपतच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.

वन क्षेत्रात येत असलेली शेतजमीन निर्वणीकरण झाल्याबाबतचा अभिप्राय देऊन जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठविण्यासाठी बोराडे याने तक्रारदारास ४० हजार रुपयांची लाच मागितली होती.

ती रक्कम घेताना अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला आळेफाटा येथे रंगेहाथ जेरबंद केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराचा मावसभाऊ संगमनेर तालुक्यातील डोळासणे येथे राहत असून

त्याची वनक्षेत्रात येत असलेली शेतजमीन ही निर्वणीकरण करावयाची होती. जमीन निर्वनकरण झाल्याबाबचा अभिप्राय देऊन जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवन्यासाठी संगमनेर

येथील सहाय्यक वनसंरक्षक विशाल किसन बोराडे याने तक्रारदाराकडे संगमनेर येथे ४० हजार रुपयांची मागणी केली होती.

ही रक्कम आळेफाटा येथे देण्याचे ठरले. यानुसार बोराडे ही रक्कम स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने छापा टाकून बोराडे यांना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलिस उपाधीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

अहमदनगर लाईव्ह 24