अरे बापरे : चक्क अंत्ययात्रेवर दगडफेक..! ‘या’ तालुक्यात घडला संतापजनक प्रकार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- आज कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. दुर्दैवाने या आजाराने अनेकांचा बळी गेला. कोरोनाच्या दहशतीने मृत नागरिकांच्या अंत्यविधीसाठी देखील कोणी पुढे येत नव्हते.

या अत्यंत वेदनादायी व मन हेलावणाऱ्या घटनेच्या धक्क्यातून सावरत असताना चक्क एका अंत्ययात्रेवरच दगडफेक केल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार संगमनेर तालुक्यात घडला आहे. याबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करत असे हीन कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, संगमनेरातील एका महाविद्यालयाच्या निवृत्त कर्मचाऱ्याचे निधन झाले हेते. त्यांची अंत्ययात्रा त्याच दिवशी सायंकाळी साडेचारच्या सुमारास पुणे नाक्याजवळील स्मशानाजवळ पोहोचली.

अंत्ययात्रा अमरधामच्या प्रवेशद्वारापर्यंत आल्यानंतर बाहेरील बाजूस बांधण्यात आलेल्या चौथऱ्यावर पार्थिव ठेवून काही विधी करून त्यानंतर खांदे बदलण्याचाही संस्कार होतो.

याचवेळी विरुद्ध बाजूने अंत्यविधीसाठी जमलेल्या नागरिकांवर दगड फेकण्यात येऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्ना झाला. सुदैवाने यात कोणालाही इजा झाळी नाही. मात्र अंत्यविधीवर दगडफेकीसारखा धक्कादायक व संतापजनक  प्रकार घडल्याने शहरात संताप निर्माण झाला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24