अरे बापरे..! या तालुक्यातील बारा गावांना पुराचा वेढा…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- दोन दिवसांपासून शेवगांव – पाथर्डी तालुक्यातील डोंगर भागात कोसळणाऱ्या जोरदार पावसाने या दोन्ही तालुक्यातील अनेक ओढे, नदी, नाले दुधडी भरून वाहत आहेत.

त्यात अनेक बंधारे, पाझर तलाव ओव्हर फ्लो झाल्याने नदी काठी पूर स्थिती निर्माण झाली आहे. पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील डोंगरभागांत काल झालेल्या पावसामुळे शेवगाव तालुक्यातील नंदिनी नदीला पूर आला असून ,

यामुळे नदीकाठी असलेले आखेगाव, खरडगाव, वरूर, भगूर, वडुले, ठाकूर पिंपळगाव या गावांत पूर परस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील नंदिनी, चांदणी, वटफळी या तीनही नद्यांना पूर आला आहे.

नदी पात्रापासून सुमारे पाऊण किलोमीटर अंतरापर्यंत पाण्याने अतिक्रमण केल्याने वरूर गावातील हनुमान मंदिर, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा अशा गावाच्या परिसरात नदीचे पाणी शिरले.

नदीच्या पाण्याला वेग असल्याने नागरिकांचे प्राण संकटात आले यावेळी लोकांचे घरातील अत्यावश्यक वस्तू, धान्य, पैसे, सोने, जनावरे, घराची पडझड आदींसह मोठ्या स्वरूपाचे नुकसान झाले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24