अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- आजही असे काहीपेनी स्टॉक्स आहेत, जे गुंतवणूकदारांना मालामाल करून टाकतात. केवळ काही हजारांची गुंतवणूक अन् काही महिन्यांतच लाखों होतात.
नेमके काय कोणता आहे असा पेनी स्टॉक ? याबाबतची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. SEL Manufacturing Company Ltd असे या स्टॉकचे नाव आहे.
हा पेनी स्टॉक गेल्या 6 महिन्यांत मल्टीबॅगर ठरला आहे. या स्टॉकने 6 महिन्यांत 80,000 टक्के इतका जबरदस्त परतावा दिला आहे. आजपासून 6 महिन्यांपूर्वी सेल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा हा स्टॉक केवळ 35 पैशांचा होता.
पण, हा स्टॉक इतक्या लवकर गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देईल, असा कुणी विचारदेखील केला नव्हता. सेल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा स्टॉक 6 महिन्यांत 35 पैशांवरुन 281 रुपयांपर्यंत वाढला आहे.
हा मल्टीबॅगर स्टॉक 27 ऑक्टोबर 2021 रोजी NSE वर फक्त 35 पैसे होता, जो आता वाढून 281 रुपये झाला आहे. तुम्ही या स्टॉकमध्ये 6 महिन्यांपूर्वी म्हणजे ऑक्टोबर-2021 मध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते,
तर आज ती रक्कम 8 कोटी रुपये झाली असती. तर या शेअरमध्ये 6 महिन्यांपूर्वी फक्त 1000 रुपये गुंतवले असते तर ती गुंतवणूक 8 लाख रुपयांपर्यंत वाढली असती.