Budget Car : अरे व्वा! 10 लाखांपेक्षा कमी किमतीत घरी आणा स्पोर्टी लूक असणाऱ्या ‘या’ कार

Budget Car : भारतीय बाजारात अनेक कार्स लाँच असतात. महत्त्वाचे म्हणजे या सर्व कार्स एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स असणाऱ्या आहेत. त्यामुळे या कार्सच्या किमतीही जास्त आहेत.

अशातच आता नवीन वर्षात कार्सच्या किमतीही महाग होणार आहेत. परंतु, बाजारात 10 लाखांपेक्षा कमी किमतीत जबरदस्त फीचर्स आणि स्पोर्टी लूक असणाऱ्या उपलब्ध आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Hyundai आणि Tata ने भारतीय बाजारपेठेत 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत लॉन्च केल्या आहेत. तसेच या कारमध्ये कमी किमतीसोबतच त्यांची फीचर्सही जबरदस्त आहेत. त्यामुळे त्या इतर कंपन्यांच्या कार्सला टक्कर देतात. शक्तिशाली इंजिन आणि स्पोर्टी लुक असलेल्या पाहुयात या कार्स.

1. Hyundai Grand i10 Nios Turbo

जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्ही नवीन स्पोर्ट्स कार शोधत असाल तर तुमच्यासाठी Hyundai Grand i10 Nios Turbo हा चांगला पर्याय आहे. आकर्षक लूक आणि फीचर्सच्या बाबतीत ही कार इतर कारला टक्कर देते.

किंमत 8.02 लाख रुपये असून तीन-सिलेंडर 1-लिटर टर्बो पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित, ते जास्तीत जास्त 100 PS पॉवर आणि 172 Nm टॉर्क जनरेट करते. तसेच यामध्ये 5 स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे.

2. Tata Altroz ​​iTurbo

टाटांची वाहने त्यांच्या मजबुतीसाठी ओळखली जातात. Tata Altroz ​​iTurbo ही स्पोर्टी लूकसह, हॅचबॅक कारच्या यादीत येते. यामध्ये टर्बो पेट्रोल 1.2 लीटर इंजिन आहे. जे 110 च्या पॉवरसह जास्तीत जास्त 140 Nm टॉर्क जनरेट करते. हे 5-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. यामध्ये खूप आधुनिक फीचर्स असून किंमत 8.25 लाख रुपयांपासून सुरू होते.

3. Hyundai i20 N Line

Hyundai च्या या कारमध्ये 1 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. हे 120 PS पॉवरसह जास्तीत जास्त 172 Nm टॉर्क जनरेट करते. या कारचा लुक आकर्षक आहे. यासोबतच चारही टायरमध्ये डिस्क ब्रेक दिले असून सुरुवातीची किंमत 10 लाख रुपयांपासून सुरू होते.