Post Office Scheme : अनेकजण चांगल्या भविष्यासाठी गुंतवणूक करत असतात. परंतु, त्यांना कोणतीही जोखीम आणि जबरदस्त परतावा हवा असतो. जर तुम्हीही अशाच योजनेच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
तुम्ही पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक करू शकता. विशेष म्हणजे या योजनेत कोणतीही जोखीम नसते शिवाय परतावाही जबरदस्त मिळतो. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट असे या योजनेचे नाव आहे.
जर तुम्हाला या पोस्ट ऑफिसच्या भन्नाट योजनेत 16 लाख रुपये कमवायचे असतील तर तुम्हाला या योजनेत महिन्याला दहा हजार रुपये गुंतवावे लागतील.
हे लक्षात घ्या की ही गुंतवणूक तुम्हाला दहा वर्षे दरमहा करावी लागणार आहे. मॅच्युरिटीच्या वेळी, तुम्ही 16,89,871 रुपयांचा लाभ घेऊ शकता.
तुम्हाला या योजनेत 12 लाख रुपये गुंतवावे लागतील. तेव्हा तुम्हाला गुंतवणुकीवर 4,89,871 रुपयांचा परतावा मिळेल. देशातील अनेक जण या योजनेत गुंतवणूक करतात
जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुमचे वय 18 वर्ष असावे. 18 वर्षांवरील कोणतीही भारतीय व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. तुम्ही या योजनेत 100 रुपयांची गुंतवणूक सुरू करू शकता. गुंतवणुकीचे पैसे दर तिसऱ्या महिन्याला तुमच्या खात्यात जमा केले जातात. तसेच या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो.