Petrol-Diesel Price Today: तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर केले अपडेट, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर……..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Petrol-Diesel Price Today: बुधवारी सकाळी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol and diesel prices) अपडेट केले आहेत. तेलाच्या किमतीतील दिलासा आजही कायम आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तेलाच्या किमतीत वाढ झालेली नाही. राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह सर्व राज्यांमध्ये किमती स्थिर आहेत.

IOCL च्या म्हणण्यानुसार, दिल्लीत आज एक लिटर पेट्रोल 96.72 रुपयांना विकले जात आहे, तर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे. मुंबईत (Mumbai) पेट्रोल 111.35 रुपये तर डिझेल 97.28 रुपये आहे.

त्याचवेळी चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर, येथे एक लिटर पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपयांना विकले जात आहे. दुसरीकडे कोलकात्यात पेट्रोलचे दर 106.03 रुपयांवर आहेत, तर डिझेल 92.76 रुपयांना उपलब्ध आहे.

जाणून घ्या इतर शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर… –

  • पाटणामध्ये पेट्रोल 107.24 रुपये, डिझेल 94.04 रुपये आहे.
  • राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल 113.65 रुपये आणि डिझेल 98.39 रुपयांना उपलब्ध आहे.
  • जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये, डिझेल 93.72 रुपयांना विकले जात आहे.
  • गुरुग्राममध्ये पेट्रोल 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपयांना विकले जात आहे.

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा –

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएस (SMS) द्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइल (Indian Oil) च्या ग्राहकांना RSP कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल.

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज अपडेट केले जातात –

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या आधारावर तेल विपणन कंपन्या (Oil marketing companies) दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम (Bharat Petroleum) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती अपडेट करतात.