Ola Electric Bike: मार्केटमध्ये खळबळ ! स्कूटरनंतर ओला लाँच करणार इलेक्ट्रिक बाईक ; जाणून घ्या काय असेल त्यात खास

Ola Electric Bike: भारतीय ऑटो बाजारामधील इलेक्ट्रिक स्कूटर सेगनमेंटमध्ये ओलाने दमदार एंट्री केली होती. कंपनीने आता पर्यंत तीन जबरदस्त स्कूटर लाँच केले आहे. ज्यांना ग्राहकांची भरपूर पसंती मिळत आहे.

मागच्या महिन्यात ओला सर्वाधिक इलेक्ट्रिक स्कूटर विकणाऱ्या कंपनी पैकी एक होती. आता कंपनीने आपल्या नवीन प्लॅनबद्दल मोठा खुलासा केला आहे. कंपनी आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक लाँच करणार असल्याचे संकेत कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विटरवर दिले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

भाविश अग्रवाल यांनी नुकतेच ट्विट केले की, काही मोटरसायकल इमोटिकॉन्ससह ‘बिल्डिंग सम’ देखील वापरण्यात आले. याशिवाय आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी युजर्सना विचारले की त्यांना कोणत्या प्रकारची इलेक्ट्रिक बाइक आवडेल आणि मतदानासाठी स्पोर्ट, क्रूझर, अॅडव्हेंचर आणि कॅफे रेसरचा पर्याय दिला. वृत्त लिहेपर्यंत सर्वाधिक मतदान स्पोर्ट बाईकला (सुमारे 47.1%) झाले आहे. क्रूझर मॉडेलला 27.7%, अॅडव्हेंचर बाइकला 15.1% आणि सर्वात कमी कॅफे रेसरला 10.1% मते मिळाली. या ट्विट पोलवर 9 हजारांहून अधिक लोकांनी मतदान केले आहे.

मात्र, ओला इलेक्ट्रिक बाईकच्या तांत्रिक तपशीलाबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण कंपनी सध्याच्या ट्रेंडनुसार चांगल्या रेंजमध्ये आणि परवडणाऱ्या किमतीत लॉन्च करण्याचा प्रयत्न करेल असा विश्वास आहे. तथापि, अलीकडेच कंपनीने दिवाळीच्या मुहूर्तावर आपली परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 Air लाँच केली, ज्याची सुरुवातीची किंमत 84,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 85 किमी प्रति तास आहे आणि कंपनीचा दावा आहे की एका चार्जवर इको मोडमध्ये ही स्कूटर 101 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते.

'this' is India's Top Electric Vehicle Company Know the details

त्याची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे 4 तास 30 मिनिटे लागतात आणि त्यात तीन ड्रायव्हिंग मोड (इको, नॉर्मल आणि स्पोर्ट) आहेत. पिकअपच्या बाबतीतही ही इलेक्ट्रिक स्कूटर खूपच चांगली आहे आणि केवळ 4.3 सेकंदात 0 ते 40 किलोमीटर प्रति तासाचा वेग पकडण्यास सक्षम आहे. Ola S1 Air इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये, कंपनीने फ्लॅटबोर्ड डिझाइन, ड्युअल टोन बॉडी आणि 34 लीटरची बूट स्पेस दिली आहे, कंपनीचा दावा आहे की दोन हेल्मेट आपल्या सीटखालील जागेत एकत्र ठेवता येतात. इच्छुक ग्राहक ही स्कूटर कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून 999 रुपयांमध्ये बुक करू शकतात.

हे पण वाचा :- Gold Price Today: अर्रर्र .. सोन्याच्या दरात मोठी वाढ ! ‘इतक्या’ रुपयांनी सोने महाग ; जाणून घ्या नवीन दर