अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन दाखल झाला आहे. तसेच राज्यातही रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक बाब अशी की एकाच कुटुंबातील 9 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे.
राजस्थानमधीन जयपूरमध्ये हे 9 जण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळले आहेत. या कुटुंबाला प्रवासाचा इतिहास होता. हे कुटुंब ओमायक्रॉनचा सर्वाधिक धोका असलेल्या दक्षिण आफ्रिकेतून जयपूरमध्ये आलं होतं राजस्थानमधील जयपूरमध्ये एकूण 9 जणांना ओमिक्रॉन विषाणूची लागण झाली आहे.
येथील आरोग्य विभागाने याची पुष्टी केलीय. बाधित जयपूरमधील आदर्श नगरातील रहिवाशी आहेत.सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे. राजस्थानधील आरोग्य विभागाचे सचिव वैभव गलरीया यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ओमिक्रॉनबाधित नऊ जणांच्या लाळेचे नमुने जिनोमिक सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले होते.
त्यानंतर त्यांना ओमिक्रॉन विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले आहे. या नऊ नव्या रुग्णांव्यतिरिक्त आज महाराष्ट्रातील पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरांत सात नवे ओमिक्रॉनग्रस्त आढळले. या सर्व रुग्णांना मिळून आता देशातील ओमिक्रॉनबाधित रुग्णांचा आकडा 21 वर पोहोचला आहे
देशात असे आहेत ओमायक्रॉन रुग्ण (Omicron India Cases)
महाराष्ट्र
डोंबिवली – 1
पुणे – 1
पिंपरी चिंचवड – 6
कर्नाटक – 2
गुजरात – 1
राजस्थान -9
दिल्ली – 1
दरम्यान देशात ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या रुपाचा संसर्ग वाढत असताना केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार देशात अठरा वर्षाखालील मुलांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची परवानगी देण्याची शक्यता आहे.
सोमवारी (6 डिसेंबर) लसीकरणाविषयक राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत लहान मुलांच्या लसीकरणावर चर्चा होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकर विशेषत्वाने 12 ते 17 वर्षे या वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची परवानगी देण्याविषयी सरकार विचार करत आहे.