अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- मुंबईत ओमिक्रॉनची दोन नवीन प्रकरणे आढळून आली आहेत. ज्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली आहे. यामध्ये 25 नोव्हेंबर रोजी जोहान्सबर्ग,
दक्षिण आफ्रिकेतून आलेला 37 वर्षीय माणूस आणि त्याच दिवशी अमेरिकेतून परतलेला त्याचा 36 वर्षीय मित्र ओमायक्रॉन प्रकारात सापडला आहे. यो दोन्ही रूग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत.
दोघांनाही मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या दोन्ही रूग्णांनी फायझर या करोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.
त्यानंतरही ओमायक्रॉनचा संसर्ग झाला. मुंबईतील या दोन्ही रूग्णांच्या संपर्कातील ५ अतिजोखमीच्या आणि ३१५ कमी जोखमीच्या निकटसहवासितांचा शोध घेण्यात आला आहे.
त्यांची तपासणी सुरू आहे. राज्यातील पहिला ओमायक्रॉन रूग्ण कल्याण डोंबिवलीत आढळला होता. यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये 6 आणि पुण्यात 1 ओमायक्रॉन बाधित रूग्ण आढळले.
आता आज मुंबईत 2 जणांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. अशाप्रकारे आतापर्यंत राज्यात एकूण 10 जणांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झालेला आहे.