अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- मागील भांडणाच्या कारणावरून एका तरुणाच्या डोक्यात हातोडा मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.तसेच त्या तरुणाच्या आई वडिलांना देखील मारहाण करण्यात आली. ही घटना निंबळक येथील जय मल्हार नगर येथे घडली.
या घटनेत सचिन दत्तात्रय वाकचोरे हा जखमी झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मागील भांडणाच्या कारणावरुन बाळासाहेब सोपान माने,शिवाजी बाळासाहेब माने या बापलेकाने सचिन दत्तात्रय वाकचोरे याला शिवीगाळ करत लोखंडी हातोड्याने डोक्यात मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
तसेच सचिन याच्या आईवडिलांनाही शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारले व धमकी दिली. जखमी सचिन वाकचोरे याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात आरोपी बाळासाहेब सोपान माने,
शिवाजी बाळासाहेब माने, (दोघे रा. जयमल्हार नगर,निंबळक ) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाअसून, घटनास्थळी डिवायएसपी पाटील, मपोनि आठरे यांनी भेट दिली. आरोपी बाप लेकास पोलिसांनी अटक कली असून, पोसइ कणसे हे पुढाल तपास करीत आहेत.