अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलं आहे. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन पानी पत्रं लिहून आघाडीतील मित्र पक्षांवरच तोफ डागली आहे.
सरनाईक यांच्या या पत्रानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. कारण त्यांनी पत्रात भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं आहे.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपसोबत जुळवून घेण्याची विनंती केल्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या पत्रावर प्रतिक्रिया देत ‘विनाकारण कोण त्रास देत आहे हे शोधलं पाहिजे’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर प्रसारमाध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी मोजक्यात शब्दांत आपली प्रतिक्रिया देऊन पुढे बोलण्याचे टाळलं.
सरनाईक यांनी मत मांडले त्यावर प्रतिक्रिया द्यावे, असं काय आहे. मुळात विनाकरण त्रास दिला जात आहे, असं ते म्हणतात विनाकरण कोण त्रास देतंय? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थितीत केला.
तसंच, या पत्रातून एक महत्त्वाचा मुद्दा समोर येत आहे. विनाकारण महाविकास आघाडीतील नेत्यांना कोण त्रास देतंय याचा विचार केला पाहिजे, असंही संजय राऊत म्हणाले.